mobile software repiar course Software repiar course Available All mobile software Box & Dongles Whatsapp Me +91 9923050420 ( PAN - INDIA Services )

Social Media Icons

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday 6 December 2021

Mobile Internet: मोबाइलमधील स्लो इंटरनेटला वैतागला? स्पीड वाढवण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स By - Sp-GsM


अनेकदा इंटरनेट सुरू तर असते, मात्र त्याचा स्पीड खूपच कमी असतो. यामुळे ऑनलाइन कामे करण्यास समस्या येते. तुम्ही देखील स्लो इंटरनेटला वैतागला असाल, तर काही टिप्स वापरून स्पीड वाढवू शकता. या टिप्स काय आहेत जाणून घेऊया.
एपीएन सेट करा

तुमच्या मोबाइलमधील इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी एपीएन म्हणजेच अ‍ॅक्सिस प्वाइंट नेटवर्कचे सेटिंग करा. तुम्ही मॅन्यूअली देखील हे सेट करू शकता.
कॅशे क्लिअर करा

इंटरनेट स्लो होण्यामागे कॅशे देखील कारण असू शकते. कॅश फूल झाल्यास स्मार्टफोन स्लो होतो व याचा परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर देखील होतो. त्यामुळे कॅश क्लिअर करा.

अ‍ॅप ऑटो अपडेट्स बंद करा
मोबाइलमधील अनेक अ‍ॅप्स आपोआप अपडेट होत असतात. ऑटो अपडेट्स चालू असल्याने हे अ‍ॅप्स आपोआप अपडेट होतात. यामुळे इंटरनेट स्पीड कमी होता. त्यामुळे ऑटो अपडेट बंद ठेवा.

ऑटो प्ले डाउनलोड पर्याय बंद ठेवा

आज स्मार्टफोन असणारी प्रत्येक व्यक्ती तासंतास सोशल मीडिया वापरत असते. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेट लागते. ऑटो प्ले सुरू असल्याने जास्त डेटा लागतो व यामुळे इंटरनेट स्पीड देखील कमी होतो. तुही सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले आणि डाउनलोड पर्याय बंद करू शकता.

No comments:

Post Top Ad

Your Ad Spot

Pages