mobile software repiar course Software repiar course Available All mobile software Box & Dongles Whatsapp Me +91 9923050420 ( PAN - INDIA Services )

Featured Posts

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 1 December 2021

तुमच्या फोनमध्ये असतील ‘हे’ धोकादायक अ‍ॅप्स तर त्वरित करा डिलीट, बँक खाते होऊ शकते रिकामे By Sp-GsM

गुगल प्ले स्टोरवर अनेक धोकादायक अॅप्स उपलब्ध असून, या अॅप्समुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. मॅलवेअर असलेल्या काही अॅप्सला तब्बल ३ लाख रुपयांपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.

तुम्ही जर अँड्राइड फोनचा वापर करत असाल तर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना सावध राहणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा काही अँड्राइड अ‍ॅप्समध्ये मॅलवेअर आढळले आहे. हा बँकिंग ट्रोजन मॅलवेअर असून, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
रिचर्सरनुसार, ३ लाख रुपयांपेक्षा जास्त वेळा डाउनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये ट्रोजन मॅलवेअर आहे. या अ‍ॅप्सने गुगल प्ले स्टोर सिक्योरिटीला बायपास केले. हे मॅलवेअर यूजर्सचे बँक अकाउंट आणि पासवर्ड डिटेल्स हॅकर्सपर्यंत पोहचवतात.
ThreatFabric च्या रिसर्चरनुसार, QR कोड रीडर, डॉक्यूमेंट स्कॅनर, फिटनेस मॉनिटर, क्रिप्टोकरेंसी ट्रेडिंग प्लेटफॉर्म सारखे अ‍ॅप्स विश्वासार्ह्य नसतात. हॅकर्स या अ‍ॅप्सचा वापर करून फसवणूक करतात. जाहिरातींमुळे यूजर्स या अ‍ॅप्सला डाउनलोड करतात. मॅलवेअर अ‍ॅपच्या माध्यमातून डिव्हाइसपर्यंत पोहचतात.

हे अ‍ॅप्स फोनमध्ये असतील तर त्वरित करा डिलीट
  • Two Factor Authenticator
  • Protection Guard
  • QR CreatorScanner
  • Master Scanner Live
  • QR Scanner 2021
  • PDF Document Scanner - Scan to PDF
  • PDF Document Scanner
  • QR Scanner
  • CryptoTracker
  • Gym and Fitness Trainer
  • वरील अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर त्वरित डिलीट करा. तसेच, तुमचा बँकिंग पासवर्ड व लॉग इन डिटेल बदला. मॅलवेअर इंटरनेट बँकिंग सर्व्हिस यूजरनेम आणि पासवर्ड चोरी करण्यासोबतच, फोनची स्क्रीन देखील कॅप्चर करतात.

No comments:

Post Top Ad

Your Ad Spot

Pages