: महागाईचा पुन्हा एकदा चांगलाच झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हा मोठी झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडर (LPG Price Hike) स्वस्त होण्याऐवजी महाग झाला आहे. 1 डिसेंबरपासून गॅस सिलिंडर 100 रुपयांनी महाग झाला आहे.
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा जनतेला महागाईचा जबर फटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून गॅसच्या दरात (एलपीजी प्राइस हायक) वाढ केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर उपाहारगृहातील खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक सिलिंडर 2100 रुपयांच्या घरात
दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, पूर्णत: मोदी सरकारकडून निराशा झाली आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाल्यानंतर देशाच्या राजधानीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2101 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 266 रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि गॅसची किंमत 2000.50 रुपये होती.
No comments:
Post a Comment