itel A48 स्मार्टफोनला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या बजेट स्मार्टफोन तुम्ही फक्त १,३९९ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो.
७ हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये स्मार्टफोनची विक्री करणाऱ्या आयटेलने जिओच्या तुलनेत एक शानदार ऑफर सादर केली आहे. कंपनीने ही ऑफर itel A48 स्मार्टफोनवर दिली आहे. यासाठी होम क्रेडिट इंडियासोबत भागीदारी केली आहे. ग्राहक होम क्रेडिट इंडियाच्या मदतीने itel A48 स्मार्टफोनला फक्त १,३९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकतील. त्यानंतर ८ महिने ६२५ रुपये नो-कॉस्ट ईएमआय द्यावी लागेल. फोनची किंमत ६,३९९ रुपये आहे.
No comments:
Post a Comment